लॉकडाऊनच्या काळातही कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचल्या सुप्रिया सुळे

Pune Reporter
लॉकडाऊनच्या काळातही कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचल्या सुप्रिया सुळे
 
तंत्रज्ञानाच्या सहाय्याने व्हिडिओ कॉलवरुन विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी साधला मनमोकळा संवाद

पुणे-
देशभरात कोरोनामुळे लॉकडाऊन पुकारण्यात आल्यामुळे खासदार सुप्रिया सुळे यांनी घरातून आपल्या कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधण्यास सुरुवात केली आहे.
         झूम या अपचा वापर करत अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने  त्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांना थेट भेटत आहेत. यामुळे कार्यकर्ते देखील खुश आहेत. कोरोनाच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते विविध पातळ्यांवर सक्रीय आहेत. परंतु नेहमीप्रमाणे नेत्यांच्या भेटीसाठी त्यांना जाता येत नाही.या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी आपल्या मतदारसंघातील प्रमुख मतदारसंघातील पक्षाचे तालुकाध्यक्ष व संघटनेतील इतर पदाधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाऊन घेतल्या. याशिवाय कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी आणखी काय करायला हवे याबाबत कार्यकर्त्यांकडून आलेल्या सुचना देखील ऐकून घेतल्या. 
यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचरला असून नव्या तंत्रज्ञानामुळे जणु स्वतः सुप्रिया सुळे यांना भेटुन अडचणी सांगितल्याचे समाधान वाटत असल्याचे अमित परांडकर, अजय हिंगे या कार्यकर्त्यांनी सांगितले.
To Top