वडगाव निंबाळकर पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करत २८ हजाराची गावठी दारू केली जप्त
सोमेश्वरनगर दि: २१
निरा बारामती रस्त्यावर गावठी दारूच्या गाडीचा चा पाठलाग करत वडगाव निंबाळकर पोलिसांनी २८ हजार रुपयांच्या गावठी दारूसह एकूण ७८ हजाराचा ऐवज जप्त केला.
याबाबत पोलीस नाईक अक्षय सिताप यांच्या फिर्यादीवरून प्रकाश चैनसिंग नवले व प्रमोद प्रकाश नवले रा निंबुत ता बारामती यांच्यावर वडगाव निंबाळकर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरच्या व्यक्ती निरा बारामती रोडवर मारुती झेन गाडी क्र mh- 14 g 5966 या गाडीतून गावठी दारू वाहतूक करत असल्याची कल्पना पोलिसांना मिळते यानंतर पोलीस या गाडीचा पाठलाग करतात, आणि गाडी पकडतात मात्र आरोपी गाडी सोडून पळून जातात पोलिसांना या गाडीमध्ये ३५ लिटरची १६ कॅन मधून गावठी दारू मिळून आली तसेच ५० हजार रुपये किमतीची मारुती कंपनीची गाडी असे मिळून एकूण ७८ हजाराचा मला हस्तगत केला आहे. पुढील तपास सपोनि सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार महेंद्र फणसे करत आहेत.
COMMENTS