सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

गुळुंचे येथील तरुणांचा उपक्रम कौतुकास्पद ; तहसीलदार रुपाली सरनोबत

गुळुंचे येथील तरुणांचा उपक्रम कौतुकास्पद ; तहसीलदार रुपाली सरनोबत

मास्क शिवणाऱ्या तरुण - तरुणींचे केले कौतुक

निरा- प्रतिनिधी

    "गुळुंचे येथील तरुणांनी एकत्र येत चांगल्या प्रतीचे मास्क तयार केले असून हा उपक्रम कौतुकास्पद आहे." असे प्रतिपादन पुरंदरच्या तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी केले. गुळुंचे (ता.पुरंदर) येथे तरुणांनी एकत्र येत मास्क तयार केले. आज यातील १०० मास्कचे मोफत वाटप तहसीलदार सरनोबत यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

    कोरोनाच्या संकटकाळात अनेकजण मदतीचा हात पुढे करताना दिसत आहेत. विषाणूशी लढण्यासाठी सोशल डिस्टन्स, सॅनिटायझर व मास्क वापरण्याचे आवाहन नागरिकांना केले जात आहे. सध्या मास्क उपलब्ध होत नसून मास्कच्या किमती वाढल्या आहेत. गोरगरीब व हातावर पोट असणाऱ्या लोकांना सहज मास्क उपलब्ध होत नाहीत.अशावेळी घरातील टॉवेल, रुमाल, पंचा यांनी पुरुष तर साडीच्या पदराने नाक बांधण्याचा प्रयत्न महिला करत आहेत. मात्र, या वस्तू जास्त काळासाठी नाकातोंडावर राहत नसल्याचे लक्षात आल्यावर येथील तरुणांनी नाड्यांचे मास्क शिवले. गावातील सुरेश निगडे व रामभाऊ कर्णवर यांनी मुलांना कापड उपलब्ध करून दिले. अभिजित निगडे, शैला निगडे, दीपाली भापकर यांनी हे मास्क विनामूल्य शिवले. सोशल डिस्टन्सचे पालन करत मास्कचे वाटप करण्यात आले. 
     यावेळी तलाठी गणेश महाजन, पोलीस पाटील दीपक जाधव, कोतवाल नारायण भंडलकर, हमीद शेख, संजय चव्हाण, प्रशांत जोशी, अमोल निगडे, संदीप काळे, दत्तात्रय गोरगल आदी उपस्थित होते. 

तहसीलदारांनी टाकली कौतुकाची थाप -
अभिजित निगडे व त्याच्या कुटुंबीयांनी स्वतः विनामूल्य मास्क शिवल्याचे समजल्यावर तहसीलदार सरनोबत यांनी त्यांचे कौतुक करत त्यांना भेट म्हणून पुस्तके दिली. तसेच यापूर्वी येथील तरुणांनी स्वखर्चातून गरजू व्यक्तींना किराणा साहित्य वाटप केल्याचे तसेच डोंगराळ माळरानावर पक्षांसाठी अन्न व पाण्याची व्यवस्था केली जात असल्याचे समजल्यावर कौतुकाची थाप टाकली. तसेच आवश्यकता भासल्यास इतर गावांसाठी असाच उपक्रम राबविण्याचे आवाहन केले.


 "सामाजिक बांधिलकीतुन मी व माझ्या कुटुंबीयांनी मास्क शिवले. आगामी काळात ५०० मास्क शिवण्याचा मानस आहे. संकटकाळात एकमेकांच्या उपयोगी पडणे हाच मानवधर्म आहे." अभिजित निगडे, तरुण, गुळुंचे

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7050,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : गुळुंचे येथील तरुणांचा उपक्रम कौतुकास्पद ; तहसीलदार रुपाली सरनोबत
गुळुंचे येथील तरुणांचा उपक्रम कौतुकास्पद ; तहसीलदार रुपाली सरनोबत
https://lh3.googleusercontent.com/-t2FdyC2ZECk/XqARffcm4BI/AAAAAAAAAnE/Nlhd60yzh-YYoXUfTm37--ET1Z7Uc4akgCLcBGAsYHQ/s1600/1587548535747893-0.png
https://lh3.googleusercontent.com/-t2FdyC2ZECk/XqARffcm4BI/AAAAAAAAAnE/Nlhd60yzh-YYoXUfTm37--ET1Z7Uc4akgCLcBGAsYHQ/s72-c/1587548535747893-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2020/04/blog-post_31.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2020/04/blog-post_31.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy