गावची यात्रा रद्द करून ग्रामस्थांना जीवनाश्यक वस्तूंचे वाटप- निंबुत ग्रामस्थांचा उपक्रम
सोमेश्वरनगर -
निंबुत ग्रामस्थ आणि निरा जूबिलंट कंपनीच्या वतीने निंबुत गावातील १५०० कुटुंबाना किराणा किट वाटप करण्यात येणार आहे.
दि २१ निंबुत ता बारामती येथे बाबा कमल सभागृहात या उपक्रमाचा शुभारंभ सोशल डिस्टन्स ठेऊन पार पडला. गर्दी टाळण्यासाठी प्राथमिक स्वरूपात एका ग्रामस्थांला या किट चे वाटप करण्यात आले. यावेळी बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे, यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यानंतर गावातील जेष्ठ सतीश काकडे, जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे, सोमेश्वर चे माजी अध्यक्ष शहाजीराव काकडे, सरपंच राजकुमार बनसोडे आणि मदन काकडे यांनी कोरोनाचा पार्श्वभूमीवर गर्दी टाकण्यासाठी एक ग्रामपंचायत कर्मचारी व एक स्वयंसेवक प्रत्येक ग्रामस्थांच्या घरी जाऊन या किट चे वाटप करण्यात येणार आहे, असा निर्णय घेतला. निंबुत ग्रामस्थांचा यात्रेचा फंड सहा लाख रुपये आणि जुबीलंट कंपनीचे दीड लाख रुपये साडे सात लाख रुपयांचे दीड हजार लोकांना हे साहित्य आपण वाटत असून एक रेशनकार्ड एक किट असे संपूर्ण गावाला हे किट आपण देत आहोत, साधारणतः ५५० रुपये किंमतीचे हे किट आहे.
COMMENTS