सोमेश्वरनगर प्रतिनिधी
गेल्या आठ दिवसापूर्वी सोमेश्वरनगर परिसरात वादळ झाल्याने अनेक झाडे उन्मळून पडल्याने निरा डाव्या कालव्यावरील रस्ता बंद झाला आहे. ही झाडे त्वरित काढावी अशी मागणी बारामती तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मा. अध्यक्ष विक्रम भोसले यांनी केली आहे.
#जाहिरात
याबाबत निरा पाटबंधारे विभागाचे अभियंता चव्हाण यांना दूरध्वनीवरून संपर्क साधून ही झाडे काढण्याची विनंती केली आहे. गेल्या आठ दिवसापूर्वी सोमेश्वरनगर परिसरातील वानेवाडी, वाघळवाडी, मळशी, मुरूम या भागात वादळासह पावसाने झोडपून काढले होते, या पावसात विजेचे अनेक खांब जमीनदोस्त होऊन या भागातील विद्युत पुरवठा काही दिवस बंद होता, तर निरा डाव्या कालव्यावरील अनेक झाले पडल्याने मळशी ते सोरटेवाडी दरम्यानचा कालव्यावरील रस्ता बंद झाला आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना शेतात जाण्याचा रस्ता बंद झाला आहे तसेच अनेक गावातील नागरिकही अनेक वेळा या रस्त्याचा वापर करत असतात, त्यामुळे पाटबंधारे खात्याने त्वरित निरा डाव्या कालव्यावरील पडलेली झाडे काढावीत अशी मागणी विक्रम भोसले यांनी केली आहे.