पत्रकारांना ही विमाकवच मिळावे- महेश जगताप

Pune Reporter
पत्रकारांना ही विमाकवच मिळावे- महेश जगताप

-उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ई-मेल द्वारे विनंती

बारामती-  (प्रतिनिधी) 

आरोग्य कर्मचारी व शिक्षकांना देण्यात आलेल्या करोना विमा संरक्षणाप्रमाणेच शासनाने पत्रकारांनाही विमाकवच द्यावे, अशी मागणी बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश जगताप यांनी केली आहे.
                याबाबत बारामती पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश जगताप यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ई-मेल करून पत्रकारांनाही विमा कवच मिळावे याबाबत विनंती केली आहे. जगताप यांनी उपमुख्यमंत्री पवार यांना मेल केलेल्या पत्रात म्हंटले आहे की, 
करोना संदर्भातील अपडेट्स व माहिती राज्यातील कानाकोपऱ्यात पोहचवणाऱ्या मुंबई शहरातील अनेक पत्रकारांना करोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. राज्यात आरोग्य सेवा पुरवणारे डॉक्टर्स, नर्सेस तसेच कायदा सुव्यवस्था राखणारे पोलीस कर्मचारी यातील काहीजण करोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यात आता पत्रकारांची भर पडली आहे. त्यामुळे  आरोग्य कर्मचारी व शिक्षकांना देण्यात आलेल्या करोना विमा संरक्षणाप्रमाणेच शासनाने पत्रकारांनाही विमाकवच द्यावे,

#जाहिरात 

       शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात करोना बाधितांची संख्या कमी असली तरी त्यात वाढ होत आहे. करोना संचारबंदीमध्ये दिवसभरात घडलेल्या विविध घडामोडी, शासकीय कामांची आकडेवारी व गुन्ह्याची माहिती घेण्यासाठी पत्रकारांना विविध कार्यालयांत जावे लागते. नुकतेच शासनाने वर्तमानपत्राचा समावेश अत्यावश्यक सेवेत केला असून या करोनाविरुद्धच्या लढ्यात वर्तमानपत्रांची भूमिका महत्वाची असल्याचे जगताप यांनी मेल मध्ये नमूद केले आहे.
To Top