तळीराम सैरभैर... वडगाव पोलीस स्टेशन शेजारचा बिअर बार तळीरामांनी फोडला
सोमेश्वरनगर---प्रतिनिधी
नुकतीच वडगाव निंबाळकर या ठिकाणी बार फोडून ८ लाखाची दारू लंपास केल्याची घटना ताजी असतानाच काल रात्री चक्क पोलीस ठाण्याजवळचाच बार फोडला, मात्र या मध्ये दारू चोरीला गेली नसल्याचे समजत आहे.
लॉकडाउन पासून शासनाचे दारूची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र यामध्ये तळीरामांचे हाल झाले आहेत. त्यामुळे तळीराम सैरभर झाले असून यांनी आपला मोर्चा थेट बारकडेच वळवला आहे. गेल्या आठवड्यात वडगाव निंबाळकर येथील बार फोडून तळीरामांनी आठ लाखाची दारू लंपास केली होती, ती घटना ताजी असतानाच काल रात्री वडगाव पोलीस स्थेशन शेजारचाच बार तळीरामानी फोडला, यामध्ये सद्या तरी या मध्ये दारू चोरीला गेल्याचे दिसत नाही.
लॉकडाउनच्या काळात तळीरामांच्या संयमाचा बांध आता फुटला असून वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर असलेला बिअर बार चोरट्यांनी फोडला मात्र त्यांना दारू चोरण्यात अपयश आले.
वडगाव निंबाळकर परिसरात बिअर बार फोडीची गेल्या आठ दिवसातील ही दुसरी घटना आहे. वडगाव निंबाळकर पोलीस शेजारी अभिजीत घोडके यांचे परमिट रूम व बिअर बार आहे. काही चोरट्यांनी चोरीच्या उद्देशाने शटर उचकटून चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना अपयश आले. त्यामुळे चोरट्यांची धरण उशाला कोरड घशाला अशी स्थिती झाली असेल..
COMMENTS