सोमेश्वर' कडून..'ना नफा ना तोटा' तत्वावर १० दिवसात २८ हजार लिटर सॅनिटायझर ची विक्री

Pune Reporter
'सोमेश्वर' कडून..'ना नफा ना तोटा' तत्वावर १० दिवसात २८ हजार लिटर सॅनिटायझर ची विक्री

सोमेश्वरनगर  प्रतिनिधी

सोमेश्वर कारखान्याकडून निर्मिती  करण्यात आलेले सॅनिटायझरची अवघ्या दहा दिवसांत २८ हजार लिटरची विक्री करण्यात आली असल्याची माहिती कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी दिली. 
      सोमेश्वर कारखान्याने 'सोमेश्वर' या नावाने  तयार केलेले सॅनिटायझर कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद, बिगर सभासद, ग्रामपंचायती, शासकीय आणि निमशासकीय या सर्वांना ना नफा ना तोटा तत्वावर १०० रुपये लिटर  दरात दि १३ पासून वाटप करण्यास सुरुवात केली आहे, त्याच बरोबर अवघ्या २० रुपये किंमत असलेले मास्क देखील कारखान्याने ना नफा ना तोटा तत्वावर वाटप सुरू केले आहे.  फार्मसिटीकल कंपन्या तसेच  वितरक यांना  अजून या सॅनिटायझर ची विक्री सुरू केली नसून  ही विक्री सुरू केली तर त्यांना मात्र ते २३६ रुपये प्रति लिटर मिळणार असल्याची माहीत यादव यांनी दिली.
#जाहिरात
         कारखान्याने हे सॅनिटायझर  एक लिटर आणि पाच लिटर मध्ये ग्राहकांना उपलब्ध करून दिले आहे.  एक लिटर पॅक ची किंमत 
१०० रुपये तर  पाच लिटर पॅकची  किंमत ४५० रुपये ठेवण्यात आली आहे. यासाठी सोमेश्वर विद्यालयात याचे वाटप चालू असून गर्दी टाळण्यासाठी चार काउंटर करण्यात आलेली आहेत. तीन फूट सोशल डिस्टन्स चे पालन करून ही विक्री सुरू असल्याची माहिती कार्यकारी संचालक यादव यांनी दिली.
To Top