वादळी वाऱ्यासह, गारांच्या पावसाने सोमेश्वरनगर परिसराला झोडपले

Pune Reporter

वादळी वाऱ्यासह, गारांच्या पावसाने सोमेश्वरनगर परिसराला झोडपले

अनेक ठिकाणी विजेचे खांब वाकले, ठिक ठिकाणी घराचे पत्रे गेले उडून

सोमेश्वरनगर  दि  १९  एप्रिल 

सोमेश्वरनगर परिसराला आज  सहा वाजता वादळासह पावसाने झोडपले, शेकडो झाडे उन्मळून पडली कित्येक ठिकाणीं विजेचे खांब उन्मळून पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला आहे.  
     


      आज दि १९ रोजी  संध्याकाळी सहाच्या दरमान अवकाळी पावसाने विजांच्या गडगटासह व तुफानी  वाऱ्या  सोमेश्वरनगर या परिसराला  झोडपले आहे. यामुळे अनेक घरावरील व गोठ्या वरील पत्रे उडाले, झाडे उन्मळून रस्त्यावर पडल्याने अनेक ठिकणी वाहतूक बंद झाली, तर विजेचे खांब ही मोडून पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला आहे, त्यामुळे उद्या संध्याकाळ पर्यंत वीज पुरवठा चालू होण्याची कुठलीही चिन्हे दिसत नाहीत. 
१५ दिवसातील हा दुसरा पाऊस असल्याने  शेतकर्यांची कंबरडे पूर्णपणे मोडले आहे. गव्हाचे पीक निघाले असले तरी आता शेतकऱ्यांचे टोमॅटो, काकडी, कलिंगड, कारली, मिर्ची कोबी या भाजीपाल्याचे तसेच मका आणि कडवळ याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, मुरूम, वानेवाडी व मळशी या ठिकणी गारांचा पाऊस झाला, या पावसाने सोमेश्वरनगर, वाघळवाडी, मुरूम, वाणेवाडी मळशी या गावांना या पावसाने झोडपुन काढले
To Top