सुपे येथे १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार
सोमेश्वरनगर दि १८ एप्रिल
सुपे ता बारामती येथील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत या मुलीने वडगाव निंबाळकर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी ओंकार दादा इंगळे याला वडगाव निंबाळकर पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुपे येथील रहिवाशी असलेला ओंकार इंगळे याने पीडित मुलीला दि १६ रोजी दुपारी तीन वाजता फोन करून माझे तुझाकडे काम आहे, असे सांगून सुपे माळवाडी येथे प्राजक्ता मतिमंद विद्यालयाजवळ बोलावून जबरदस्तीने संभोग केला. हे जर तू कोणाला सांगितले तर मी तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. याबाबत वडगाव निंबाळकर पोलिसांनी ओंकार इंगळे याला अटक केली असून त्याच्यावर भा.द.वी. कलम३७६,५०४ आणि ५०६ अंतर्गत बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सपोनि सोमनाथ लांडे यांच्या सह्ययक पोलिस उप निरीक्षक साळुंखे करत आहेत.
COMMENTS