गळीत हंगाम बंद होताच सभासद साखर विक्री सुरू होणार--पुरुषोत्तम जगताप

Pune Reporter
गळीत हंगाम बंद होताच सभासद साखर विक्री सुरू होणार--पुरुषोत्तम जगताप

सोमेश्वरनगर  प्रतिनिधी

३ मे रोजी लॉकडाउन उठत आहे तसेच सोमेश्वर कारखान्याचा ऊस गळीत हंगाम येत्या चार ते पाच दिवसात संपत असून हंगाम संपताच सभासद साखर विक्री सुरू करणार असल्याची माहिती अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली. 
          काल संचालक मासिक सभा पार पडली यामध्ये सभासदांची साखर विक्री सुरू करण्याबाबत हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. सोमेश्वर रिपोर्टर शी बोलताना अध्यक्ष जगताप म्हणाले की, कोरिनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाकण्यासाठी सभासदांची साखर विक्री बंद ठेवण्यात आली होती, मात्र ती चालू करण्याबाबत संचालक मंडळाने परवानगी दिली असून गळीत हंगाम बंद होताच विक्री सुरू केली जाणार आहे. याबाबत संचालक मंडळाने काटेकोरपणे नियोजन केले असून साखर दुकानावरील गर्दी टाळण्यासाठी प्रत्येक गट निहाय दुकाने केली जाणार आहेत. गट क्र १ ची साखर विक्री ही सोमेश्वर विद्यालयात केली जाणार आहे, गट क्र २ ची साखर विक्री ही इंदिरा गांधी निकेतन या ठिकाणी गट क्र ३ ची साखर विक्री ही साखर गोडावून या ठिकाणी केली जाणार आहे, गट क्र ४ ची कोऱ्हाळे या ठिकाणी तर उर्वरीत गटातील साखर विक्री ही ज्या त्या गटात केली जाणार आहे. ज्या साखर विक्री केंद्रावर सावलीची सोय नसेल त्या विक्री केंद्रावर मंडप उभे करून साखर वाटप केले जाणार आहे.आपण वाचत आहात सा.सोमेश्वर रिपोर्टर . तसेच सोशल डिस्टन्स ठेवण्यासाठी तीन फूट अंतरावर बॉक्स आखले जाणर आहेत. 
#जाहिरात
           सोमेश्वर कारखान्याने आज अखेर ९ लाख १६ हजार मे टन उसाचे गाळप केले असून कारखान्याच्या कार्यक्षेत्रात अजून १० ते १२ हजार टनाच्या आसपास ऊस शिल्लक आहे. उर्वरित गाळप येत्या दोन ते तीन दिवसात संपवण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे. तसेच ऊस तोडणी कामगारांना त्यांच्या गावी पोहचविण्याबाबत जगताप म्हणाले की,  सोमेश्वर कारखान्यावर ऊसतोडणी कामगारांची एकूण  ४ हजार कुटुंबाची मिळून १० हजार ३०० ऊसतोडणी कामगारांची संख्या आहे.आपण वाचत आहात सा.सोमेश्वर रिपोर्टर.  तर जनावरांची ८ हजार ५०० अशी आहे. यांना सुखरूप गावी पोहचविण्यासाठी कारखाना प्रशासनाने सर्वोतोपरी तयारी केली असून ऊसतोडणी कामगारांच्या जाण्यासाठी कारखान्याकडे आत्तापर्यंत ४५० ट्रक आणि टेंपो ची आदी झाली असून एकूण ६०० वाहने लागणार असल्याची माहिती अध्यक्ष जगताप यांनी दिली.

To Top