'सोमेश्वर" ची सभासद साखर विक्री सुरू करावी-सभासदांची मागणी

Pune Reporter
'सोमेश्वर" ची सभासद साखर विक्री सुरू करावी-सभासदांची मागणी

सोमेश्वरनगर  प्रतिनिधी

सोमेश्वर कारखान्याने गेल्या एक महिन्यापासून बंद केलेली साखर विक्री सुरू करावी अशी मागणी सभासदांच्या वतीने करण्यात आली आहे.
             याबाबत आज सोमेश्वर कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांना सभासदांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.  यावेळी संचालक नामदेवराव शिंगटे, संग्रामराजे निंबाळकर, किशोर भोसले, उत्तम धुमाळ, adv. महेश राणे, लक्ष्मण गोफणे, शांताराम कापरे, वाणेवाडी चे माजी सरपंच दिग्विजय जगताप, adv नवनाथ भोसले, मिलिंद कांबळे आणि प्रमोद वायाळ आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यकारी संचालक यादव यांना दिलेल्या पत्रात म्हंटले आहे की, गेल्या एक महिन्यापासून सभासदांची साखर विक्री बंद असून सभासदांना चढ्या दराने साखर खरेदी करावी लागत आहे,  ज्या प्रकारे सोशल डिस्टन्स ठेऊन सॅनिटायझर वाटप सुरू आहे, त्याच प्रकारे सोशल डिस्टन्स ठेऊन सभासद साखरेचे वाटप सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.

To Top