निंबुत मध्ये ३०० बाटल्या रक्त संकलन

Pune Reporter
2 minute read
निंबुत मध्ये ३०० बाटल्या रक्त संकलन

सोमेश्वरनगर   प्रतिनिधी
सद्याच्या परिस्थितीत रक्ताचा तुटवडा असल्याने काही युवकांनी पुढाकार घेत आयोजिय केलेल्या रक्तदान शिबिरात ३०० बाटल्या रक्त संकलन झाले. 
             निंबुत येथील कै. संपतराव सखाराम काकडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त ,प्रमोद काकडे फाउंडेशन, ग्रामपंचायत निंबुत, एक हात मदतीचा सोशल फाउंडेशन व ज्योतिबा विकास सोसायटी यांच्या संयुक्त माध्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सोशल डिस्टन्स ठेवण्यासाठी विशेष करून हे शिबीर निंबुत येथील ब्रह्मचैतन्य मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात निंबुत, मुरूम, वाणेवाडी, करंजेपुल, वाघळवाडी, मळशी, खंडोबाचीवाडी आणि गडदरवाडी येथील युवकांनी उस्फुर्त सहभाग घेतला. अक्षय ब्लड बँक चे डॉ जरांडे आणि टीमने या शिबिरासाठी विशेष परिश्रम घेतले. 
#जाहिरात
           जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे, शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतीश काकडे, सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजीराव काकडे, राजवर्धन शिंदे व वाणेवाडीचे माजी सरपंच दिग्विजय जगताप यांनी शिबिराला भेट दिली. 

सद्याच्या काळात अपघात असतील, महिलांच्या प्रसुती असतील किंवा इतर आजार असतील या साठी रक्ताची मोठ्या प्रमाणावर रक्ताची गरज असते, मात्र याबाबत ग्रामीण भागात रक्तदानाबाबत म्हणावी तेवढी अजून जनजागृती झाली नाही, यासाठी वेळोवेळी युवकांना एकत्र येत रक्तदान शिबिरे आयोजित करणे गरजेचे आहे.   -डॉ सौरभ काकडे
To Top