राजस्थानकडे निघालेल्यांकडे नव्हता प्रवासाचा परवाना.
कोल्हापूर ते राजस्थान अवैध प्रवास तोही दुचाकीवरून.
नीरा : सनी निगडे
लॉकडाऊन नंतर संचार बंदीत जिल्हाबंदी करत जिल्ह्याच्या सिमा प्रवासासाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. आज सकाळी दुचाकीवरून काही लोक वेगात चालले होते. ही बाब बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलीस व शिक्षकांच्या नजरेत आली. त्यांनी हटकले असता ते अनैतिक पणे सिमा ओलांडून राजस्थान कडे निघाल्याचे लक्षत आले. त्यांच्याकडे फक्त आरोग्य तपासणी केल्याचे प्रमाणपत्र होते; प्रवासाचा परवाणा नसल्याचे निदर्शनास आले आणि त्यांनी माघारी जाण्याचा निर्णय घेतला. #जाहिरात
आजही नीरा नदीच्या पैलतीरावर पुणे जिल्ह्यच्या सिमेवरिल पाडेगाव येथे सातारा व पुणे पोलीसांकडून खडा पहारा सुरू होता. अकराच्या सुमारास बारा दुचाकीवरून चोवीस लोक वेगात दुचाकी दामटत निघाले होते. यावेळी बंदोबस्तासाठी तैनात असलेले पोलीस कॅनस्टेबल निलेश जाधव, ट्राफिक हवालदार सुभाष बनकर, माजी सैनिक ननवरे , प्राथमीक शिक्षक सुधाकर पवार उपस्थित होते तर बंदोबस्त कशा पद्धतीने सुरू आहे हे वार्तांकनासाठी नीरा प्रतिनीधी निगडे याठिकाणी गेले होते. त्यावेळी बंदोबस्तावरील कर्मचा-यांना सहकार्यासाठी थोडा वेळ थांबले. आणि दुचाकिंचा एक जथ्था वेगत मार्गक्रमण करत असल्याचे निदर्शनास आले. तात्काळ पोलीसांना तो जथ्था थांबवण्याचे सुचवले. जथ्यातील पहिली दुचाकी पुढे निघून ही गेली पण इतर अकरा गाड्या अडवण्यात यश आले. गाड्या अडवल्याने पुढे गेलेला दुचाकीस्वर माघारी फिरला आणि त्याच्या गाडीची नंबर प्लेट आर.जे असी दिसून आली. अजुन तीन दुचाकींचे पासिंग आर.जे (राजस्थान) असल्याचे व इतर नऊ दुचाकींची पासिंग एम.एच.०९ (कोल्हापूर) असे दिसून आले. त्यांची पोलीसांनी विचारपूस केली असता परवाणा असलेल्यचे सांगण्यात आले. परवाणे तपासणी व नोंदणीसाठी शिक्षक पवार यांच्याकडे पाठवले असता त्यांच्याकडे फक्त आरोग्य विभागाचे फिटनेस दाखला होता. शिक्षकांनी तात्काळ त्यांना समजावून सांगितले हा प्रवासचा परवाणा नसून आपण अवैध पणे प्रवास करत आहात.
बारा दुचाकीवरून चोवीस लोक राजस्थानकडे निघाल्याचे समोर आले. परंतु त्यांच्याकडे प्रवासाचा परवाणा नसल्याने त्यांनी हात जोडून विनवणी केली. पण अधिक-यांना मर्यादा असल्याने त्यांनी पुढील प्रवासासाठी नकार दिला. त्यांच्या जेवणाची वाचारपूस केली. त्यांनी जेवण नको आम्हाला आमच्या गावी जाऊद्या ही विनंती केली. अखेर त्यांनी माघारी जाण्याचा निर्णय घेतला व परवाणा काढुणच परत प्रवास करण्याचा निश्चय केला.
निगडे यांनी हात जोडत समजावून सांगितले शासनाने प्रवसासाठी जी पद्वत आहे ती अवलंबा. आपण इथुन पुढे जाताल ही पण कुठे ना कुठे तरी आपली चौकशी होणार आणि आपण अडकणार. या पेक्षा आपण रितसर कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज करा व परवानगी घेतल्यास आपला प्रवास सुखकर होईल.