नव-याच्या जाचाला कंटाळून विवाहीतेने केली आत्महत्या.
निरा येथिल प्रेमविवाह केलेले जोडपे.
नीरा : प्रतिनिधी ,सनी निगडे
सहा महिन्यांपूर्वी प्रेमविवाहा केलेल्या नीरेतील जोडप्याचे दररोज वाद होत होते. माहेराहून खर्चासाठी पैसे आणत नाही म्हणून नव-याने केलेल्या जाचाला कंटाळून विवाहीतेने राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
जेजुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वैष्णवी बबन कुदळे वय १९ हीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. नवरा बबन साधू कुदळे वय ३२ दोघे नीरा वार्ड क्र. ४ ता.पुरंदर याने माहेराहून पैसे आणत नाही या करणाने तीचा शारिरीक व मानसिक छळ केल्याने त्याच्या जाचाला कंटाळून दोरीच्या सहाय्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या दोघांनी सहा महिन्यापुर्वी प्रेमविवाह झाल्यचे तिच्या वडिलांनी सांगितले. विवाहानंतर दोघे नीरा येथे भाडोत्री खोली घेऊन राहत होते. दोन महिन्यांपूर्वी मुलीने फोन करून सांगितले की सोनोग्राफी करण्यासाठी नवरा पैसे मागत आहे, पैसे न दिल्याने शिवीगाळ करून मानसीक त्रस देत आहे. रविवारी सकाळी ९ वाजता नीरा दुरक्षेत्रातून फोन आला की तुमच्या मुलीने राहत्या घरी आत्महत्या केली असल्याचे समजले.
मयतेचे वडील सुनील सोपन गायकवाड रा. हिवरे ता.पुरंदर यांनी तक्रार दाखल केली आहे. पुढिल तपास सहायक पोलिस निरीक्षक अंकुश माने यांच्या मार्गदर्शनाखाली फोजदार विजय वाघमारे करत आहेत.