बारामती - प्रतिनिधी हेमंत गडकरी
कोरोनाविरुद्ध उपाययोजना करण्याच्या उद्देशाने शासनाला मदत करण्यासाठी बारामती येथील अॅग्रीकल्चरल डेव्हल्पमेंट ट्रस्टच्या कृषी महाविद्यालयाच्या सन २००४ च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे. बॅचच्या नावास अनुसरून १ लाख २००५रुपयांची मुख्यमंत्री सहायता निधीला मदत केली आहे.
सद्यःस्थितीत कोरोना विषाणूने थैमान घातले असून देशामध्ये महाराष्ट्राला सर्वाधिक फटका बसला आहे.कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये मदत करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत व राज्यासाठी एक नागरिक म्हणून आपली जबाबदारी ओळखून बारामतीच्या कृषी महाविद्यालयाच्या सन २००४ च्या या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी राज्य सरकारला तब्बल १ लाख ४ हजार ४ रुपयांची आर्थिक मदत ऑनलाइन स्वरूपात प्रदान केली.
यासाठी विविध शासकीय पदावर अधिकारी,शेतकरी, बॅंकिंगसह विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या व्हाट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून राज्य सरकारच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये आर्थिक मदत करण्याची संकल्पना मांडली. या संकल्पनेला ग्रुपमधील सहकाऱ्यांनी एकमेकांशी चर्चा करून त्वरित शासनाला आर्थिक स्वरूपात मदत करण्याचे निश्चित केले. यानुरुप संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र पवार, विश्वस्त सुनंदा पवार, आ.रोहित पवार यांच्या आदर्शानुसार तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व शिक्षक यांच्या शिकवणुकीतुन या मोहिमेमध्ये ९९ माजी विद्यार्थ्यांनी सहभाग घेत २ दिवसांमध्ये तब्बल १ लाख २ हजार ४ गोळा करून शनिवार (ता.०९) रोजी ही सर्व रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ऑनलाइन स्वरूपात पाठविण्यात आली.
याबाबत महाराष्ट्र शासनाने सुद्धा दखल घेत आभाराचे पत्र प्रत्येक ग्रुपला पाठवले आहे. कृषी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी केलेल्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.