आपला तो बाबू आणि दुसऱ्याचं ते कार्ट असा भेदभाव नको- दिग्विजय जगताप
ग्रामपंचायती आपलं काम चोख करणार का?
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
येत्या दोन दिवसात पुणे आणि मुंबईवरून शेकडोंच्या संख्येत लोक ग्रामीण भागात दाखल होत असून ग्रामपंचायत प्रशासनाने पुढाकार घेऊन या लोकांना क्वारेंटाईन करणे गरजेचे आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठ दिवसापासून शासनाने वाहतूक व्यवस्था शिथील केल्यापासून पुणे आणि मुबंई वरून शेकडोंच्या संख्येने लोक ग्रामीण भागात दाखल होऊ लागले आहेत. त्यामुळे आता ग्रामपंचायत प्रशासन आणि आरोग्य विभाग या दोघांवर आणखीनच जबाबदारी वाढणार आहे. शासनाच्या नियमानुसार बाहेरील व्यक्तीने गावात आल्यानंतर त्याला १४ दिवस क्वारेंटाईन करणे गरजेचे आहे. मात्र आता येणारांची संख्याच वाढल्याने ग्रामपंचायत प्रशासन हतबल झाले आहे.
सोमेश्वरनगर परिसरातील मुरूम, वाणेवाडी, सोमेश्वरनगर, वाघळवाडी, करंजे, करंजेपुल, निंबुत, सोरटेवाडी आदी भागातून आता मुंबई आणि पुणे वरून लोक येऊ लागले आहेत. जरी हे लोक येत असले तरी आता ग्रामपंचायत सरपंच, सदस्य आणि आरोग्य विभागावर जादाचा भार पडणार आहे. त्यामुळे कोणत्याही कुटुंबात बाहेरील गावावरून येणाऱ्या लोकांची माहिती ग्रामपंचयातीला देणे बंधनकारक आहे. बाहेरील गावावरून येणाऱ्या लोकांची राहण्याची आणि खाण्याची सोय ग्रामपंचायत करणार आहे.
आपला तो बाबू आणि दुसऱ्याचं ते कार्ट: हा भेदभाव नको: दिग्विजय जगताप
वाणेवाडी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावठाण, दत्तवाडी, चव्हाणवाडी, विकासनगर, रामनगर आणि मळशी या भागातून पुणे आणि मुंबई वरून लोक आले आहेत. मात्र गरिबांचा असलाकी त्याला क्वारेंटाईन आणि मोठ्याचा असला की त्याला घरात प्रवेश याबाबत कोणताही भेदभाव न करता सर्वांना क्वारेंटाईन करणे गरजेचे आहे.
गावकरी घेणार पुढाकार
वाणेवाडी गावात बाहेरून येणाऱ्या लोकांना क्वारेंटाइन करण्यासाठी आता गावकरी ग्रामपंचायतीला मदत करणार असून वाणेवाडी चे माजी सरपंच दिग्विजय जगताप, एक हात मदतीचा सोशल फाउंडेशन चे सचिव adv. नवनाथ भोसले, बारामती तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश जगताप, धनंजय भोसले आणि इंद्रजित भोसले हे पुढाकार घेणार आहेत.