निंबुत छपरी वरील त्या दगडाचे रहस्य काय ?
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
निरा बारामती रस्त्यावर निंबुत ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या निंबुत छपरी या ठिकाणी रस्त्याच्या कडेला असलेला दगडांचा ठिगारा दिवसेंदिवस वाढत जात असतो नेमके या ठिगाऱ्याचे रहस्य काय? मानवनिर्मित का अंधश्रद्धा याबाबत तर्क वितर्काना उत आला आहे.
जाहिरात
नीरा बारामती रस्ता हा बारामती तालुक्यातील एक मुख्य रस्ता आहे या रस्त्यालगत अनेक सेवारस्ते आहेत अनेक गावे आहेत अनेक बाजारपेठा आहेत. या रस्त्याला अनेक ठिकाणी मोठे चढ, तीव्र उतार, अवघड वळणे आहेत. या रस्त्यावरून रोज हजारो प्रवासी प्रवास करतात सोमेश्वर नजीक असलेल्या निंबुत छपरी येथे वाहणाऱ्या निरा डावा कालव्याच्या वरून जाणाऱ्या निरा बारामती रस्त्यासाठी एक पूल आहे .निरीकडून बारामतीला जात असताना या क्षेत्रामध्ये आल्यानंतर तीव्र चढ जाणवतो व वाहन चालवत असताना अचानकच या पुलाच्या अगदी रस्त्या वरती दोन मोठे दगडांचे ढीग समोर येतो त्यामुळे वाहन चालक गडबडतात व अपघात होऊ शकतात अशी सोशल मीडियावर ती आज सकाळपासून चर्चा रंगू लागली चार पाच दगडांचे अचानक ब्रास भर दगड या पुलावरती कसे काय झाले ?दगडांचा ढीग अपघातांना आमंत्रण देत आहे त्याला त्वरित हटवा ? या दगडांच्या ढिगाच रहस्य काय? या दगडांना कोणी शेंदूर फासण्यासाठी आणले तर नाही ना ?असे अनेक प्रश्न सोमेश्वरनगर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र बालगुडे व अन्य नागरिकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून उपस्थित केले .
सोशल मीडिया व्हॉट्सअॅप ग्रुप वरती झालेल्या चर्चेत वडगाव निंबाळकर चे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांचे लक्ष वेधले गेले .त्यांनी तात्काळ या पुलावरती साठलेल्या दगडांचा ढीग हटवला.
सोमेश्वर रिपोर्टरच्या प्रतिनिधींनी याबाबत सखोल चौकशी केली व खोलात गेल्यानंतर वेगळेच कारण समोर आले वास्तविक निंबुत छपरी या ठिकाणी निरा डाव्या कालव्यावर रस्त्याला चढ आहे. याठिकाणी साठलेले दोन दगडांचे ढिगारे दिवसेंदिवस वाढत जात असतात नेमके यामागचे रहस्य काय? असा सवाल वाहनचालकांना पडला आहे. याठिकाणी एक छोटंसं मंदिर पण आहे. मात्र या दगडांचा या मंदिराशी काही संबंध नसून या ठिकाणावरून ऊसतोडणी बैलगाड्यांची वाहतूक होत असते. चढाचा रस्ता असल्याने बैलगाडी या ठिकाणी चढत नसल्याने ऊसतोडणी कामगार याठिकाणी गाडीच्या चाकाला उटी लावण्यासाठी या दगडांचा वापर करत व उपयोग झाल्यानंतरही हा दगड एका बाजूला फेकून देतात त्यामुळे या दगडाच्या ढिगाची निर्मिती झाली असल्याची बाब समोर आली, आणि त्या दगडांचे रहस्य उलगडले.
बांधकाम विभागाचे काम केले वडगाव निंबाळकर पोलिसांनीनिंबुत छपरी या ठिकाणी दगडाचे ढिगाऱ्यांमुळे वाहतुकीला अडथळा होत असल्याची पोस्ट सोशल मीडियावर फिरत होती. वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी तात्काळ जेसीबी ने हे दगड बाजूला केले