वडगाव निंबाळकर च्या अष्टविनायक मंडळाचा उपक्रम
कोरोना योद्ध्यांचा सन्मान
वडगाव निंबाळकर, ता. १६
कोरोनाचा संसर्ग गावात होऊ नये यासाठी प्रयत्नशील राहिलेल्या आरोग्य सेविका, आशा सेविका, आणि ग्रामविकास अधिकारी यांचा सन्मान वडगाव निंबाळकर ता. बारामती येथील अष्टविनायक तरुण मंडळाच्या वतीने करण्यात आला.
गावातील सात आशा सेविकांना जिवनाश्यक किराणा वस्तुंचे किट यावेळी देण्यात आले. कोरोनाचे संकट जगावर आहे यामधून आपल्या गावात संसर्ग होऊ नये यासाठी सतत कार्यरत राहिलेले सेवक हे गावचे रक्षक आहेत.
त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सन्मान आयोजित केला आहे असे मत माजी सरपंच धैर्यशील राजेनिंबाळकर यांनी व्यक्त केले. मंडळाचा हा उपक्रम स्तुत्य असून चांगल्या कामाला प्रोत्साहन देणारा आहे असे मत निवृत्त महसुल उपायुक्त शिवाजीराजे राजे निंबाळकर यांनी व्यक्त केले. ग्राम विकास अधिकारी शहानुर शेख आरोग्य सेविका लोखंडे युएस आशा सेविका सुचिता गायकवाड अनुराधा काकडे पुष्पा लोणकर वैशाली शिंदे आनंदी आगम ज्योती शिंदे वैशाली निंबाळकर यांचा सन्मान केला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र शिंदे, विराजराजे राजेनिंबाळकर, सचिन शीलवंत, निलेश शीलवंत, संतोष राजेनिंबाळकर, सचिन शिंदे, मुस्ताक शेख, अविनाश शितोळे उपस्थित होते.