नीरा ग्रामपंचायतीला औषध फवारणीसाठी यंत्र.
वर्दळीच्या बाजारपेठेत औषध फवारणी करावी लागणार.
नीरा : प्रतिनिधी सनी निगडे
कोरोना विषाणुचा प्रसारा रोखण्यासाठी सोशल डिस्टंसिंग बरोबरच गावांमध्ये औषध फवारणी करणे गरजेचे झाले आहे. राज्य शासनाच्या निर्णयानुसार टप्या टप्याने बाजारपेठा उघडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळे लोकांची वर्दळ वाढणार आहे. त्या अनुषंगाने फवारणी करावी लागणार आहे. फवारणीसाठी यंत्र स्थानिक आमदार निधीतून उपलब्ध करून देत आहोत असे प्रतिपादन आमदार संजय जगताप यांनी नीरा येथे केले.
#जाहिरात
कोव्हिड १९ विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी या पुढील काळात सतत औषध फवारणी करावी लागणार आहे. बस स्थानक, रेल्वे स्टेशन, ग्रामपंचायत परिसर, मंदिरे, बाजारपेठा, बॅंक अशा ठिकाणी नियमित फवारणी करावी लागणार आहे. त्यासाठी फवारणी यंत्र ग्रामपंचायतीकडे उपलब्ध असणे आवश्यक आहे. फवारणी यंत्राची गरज ओळखून आमदार निधीतून हे यंत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. हे यंत्र पुरंदर तालुक्यातील नीरा परिसरातील गावातही वापरण्यास द्यावे असे जगताप यांनी सांगितले. आभार अभिजीत भालेराव यांनी मानले.