अपघातात करंजेपुल येथील दोघे ठार

Pune Reporter
अपघातात करंजेपुल येथील दोघे ठार

सोमेश्वरनगर   प्रतिनिधी

निरा बारामती रोडवर वाघळवाडी या ठिकाणी मारुती इर्टिगा गाडीने पाठीमागून धडक दिल्याने  दोन जण जागेवरच ठार झाले. 
            शरद गुळुंबे आणि राजेंद्र भोंडवे अशी अपघातात  ठार झालेल्यांची नावे आहेत. प्राथमिक माहितीनुसार  करंजेपुल वरून दुचाकीवर शरद  गुळुंबे आणि राजेंद्र भोंडवे हे निरेच्या दिशेने दुचाकी गाडी नं: एम एच ४२ ए एम ८८६५ वरून  निघाले होते तर निरेच्याच दिशेने जाणारी मारुती इर्टिगा गाडी नं. एम एच १२ जे यु ३७३५ हिने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील दोघेही जागीच ठार झाले. त्यांना तातडीने बारामती या ठिकाणी हलविले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अपघात होताच चालक पसार झाला असून सहप्रवासी असलेल्या एका जनाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पूढील तपास वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार महेंद्र फणसे करत आहेत
To Top