मुस्लिम बांधवांनी एकत्र येत नमाजपठण करू नये, घरीच करावे- सपोनि सोमनाथ लांडे
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
उद्या मुस्लिम बांधवांचा पवित्र सण रमजान ईद साजरी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव नमाजपठण करण्यासाठी एकत्रित येतात. यावर्षी कोरोनाचा वाढता प्रभाव पाहत लोकांनी एकत्रीतपणे नमाजपठण न करता घरातच नमाजपठण करावे असे आवाहन वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी केले आहे.
जाहिरात
मुस्लिम धर्मियांचा पवित्र महिना रमजान सुरू आहे. गेली ३० दिवस मुस्लिम बांधव व महिला रमजानचे रोजे (उपवास) करतात. दिवसभरात पाचवेळा घरातच नमाज अदा करण्यात येत आहे. सोमवार दि.२५ मे रोजी रमजान ईद आहे. ईद निमित्त मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव मशिदीत किंवा समोर येऊन नमाज अदा करतात. यावर्षी कोव्हिड१९ विषाणूचा प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन झाल्याने लोकांनी एकत्रित येऊन असे धार्मिक कार्यक्रम करण्यास मज्जाव केला आहे. तरी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ६२ गावांतील मुस्लिम बांधवांना ईद निमित्त एकत्रीत नमाज करु नये, स्वताच्या घरातच नमाजपठण करावे असे आवाहन सपोनि लांडे यांनी केले आहे.