पशुपक्ष्यांना चारा व पाणी देण्यासाठी अभिनव संकल्पना.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
पशुपक्ष्यांवर प्रेम करणारे पक्षीप्रेमी अनेक आहेत. अशाच एका पशु पक्षावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीने अभिनव संकल्पना राबवून पशुपक्ष्यांना चारा व पाणी मिळेल, याची व्यवस्था एकाच ठिकाणी सुंदर कल्पनेतून केलेली असल्याने सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलेला आहे.
जाहिरात
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पशुपक्ष्यांना पिण्यासाठी पाणी मिळत नसते. त्यामुळे अनेक लोक आपल्या घराभोवती, झाडावर, घराच्या छतावर, मातीची मडकी अथवा भांड्यामध्ये पाणी ठेवत असतात. त्यामुळे पशुपक्ष्यांना उन्हाळ्यामध्ये पिण्याकरता पाणी मिळत असल्यामुळे त्यांची अडचण दूर होते.
पशुपक्षी प्रेमी यांनी चांगली संकल्पना राबविलेली आहे. तेलाचा रिकामा डबा चारी बाजूंनी कट करून त्यामध्ये अन्नधान्य आणि डब्याचा मध्यभाग यामध्ये पाणी ठेवलेले असल्याने पशुपक्ष्यांना एकाच ठिकाणी चारा व पाणी मिळणार आहे. ही संकल्पना कोणाचीही असो. मात्र, चांगली संकल्पना आहे. या संकल्पनेचा सर्वांनी आपल्या घराभोवती किंवा घरासभोवती असणाऱ्या झाडांवर केला तर निश्चितपणाने पशुपक्ष्यांचे अन्नपाण्यावाचून होणारे हाल थांबतील आणि पशुपक्ष्यांचा किलबिलाट कानावर पडल्यानंतर खरा निसर्गाचा आनंद ऐकण्याची वेगळीच मजा मिळेल. विविध पक्ष्यांचे विविध आवाज असतात, अशा पक्षांना जतन करण्याकरता पक्षी प्रेमींची धडपड असते आणि हीच धडपड पाहून सर्वसामान्य जनतेमध्ये सुद्धा पशु पक्षांविषयी दिवसेंदिवस प्रेम वाढत चाललेले आहे. अशा सर्व पक्षीप्रेमींना सा. सोमेश्वर रिपोर्टर परिवार यांचेकडून धन्यवाद. असेच आपल्या हातून पशुपक्ष्यांची सेवा घडो आणि त्यांच्या बागडण्यामध्ये किलबिलण्याचा आनंद घेत जाऊया.
जाहिरात