रमजान ईद निमित्त शिरखुर्मा साहित्य वाटप.आ.संजय जगताप व मित्र परिवाराचा उपक्रम.

Pune Reporter
रमजान ईद निमित्त शिरखुर्मा साहित्य वाटप.
आ.संजय जगताप व मित्र परिवाराचा उपक्रम.

पुरंदर :प्रतिनिधी 
          कोरोनाच्या विळख्यात देशासह राज्यातील सर्वसामान्य जनता अडकल्याने हवालदिल झाली आहे. या दरम्यान मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याचे रोजे व रमजान ईद आली आहे. त्यामुळे मुस्लिम बांधवांना साधेपणाने का होईना ईद साजरी करता यावी याकरिता नीरा (ता.पुरंदर) येथील मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या निमित्ताने पुरंदरचे आमदार संजय जगताप व मित्र परिवाराचा वतीने शिरखुर्माचे साहित्य वाटप करण्यात आले.
जाहिरात
        आमदार संजय जगताप व राजवर्धिनी जगताप यांच्या माध्यमातून आनंदी दुध ३२० लिटर व नीरेचे माजी सरपंच राजेश काकडे यांनसह काकडे परिवार यांच्या वतीने ३०० कुटुंबांना प्रत्येकी दोन किलो साखर व शेवईच्या पुड्याचे रविवारी ( दि.२४) वाटप करण्यात आले.
          या वेळी माजी सरपंच राजेश काकडे, चंदरराव धायगुडे, पुणे जिल्हा गटसचिव संघटनेचे जनरल सेक्रेटरी रफीक शेख , पुरंदर तालुका अल्पसंख्यांंक सेलचे अध्यक्ष मोबीन बागवान, हरिभाऊ जेधे, कल्याण जेधे, संदेश गायकवाड, अभिषेक भालेराव, सतिश पवार, सिकंदर शेख, जावेद शेख, फिरोज सय्यद, नदीम सय्यद आदी उपस्थित होते.
        यावेळी मुस्लिम बांधवांच्या वतीने जावेद शेख व सिकंदर शेख यांनी आ.संजय जगताप व मिजी सरपंच राजेश काकडे यांचे आभार मानले.
जाहिरात

To Top