वडगाव निंबाळकर पोलिसांचा वतीने मुस्लिम बांधवांना फळे वाटप
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
रमजान महिन्याचे औचित्य साधून मुरूम आणि वाणेवाडी येथील मुस्लिम बांधवांना वडगाव निंबाळकर पोलीसांच्या वतीने फळांचे वाटप करत ईद च्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाययक पोलीस उपनिरीक्षक सुभाष मुंढे, पोलीस हवालदार महेंद्र फणसे, पोलीस नाईक नितीन बोराडे,, बारामती तालूका पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश जगताप, पत्रकार तुषार धुमाळ तसेच नूरमहंमंद तांबोळी, शाफिक मुलाणी, शहाबुद्दीन पठाण, असल्लम शेख, महंमद शेख, अमिनभाई तांबोळी यांच्या सह मुस्लिम बांधव उपस्थित होते.
तसेच सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप आणि वाणेवाडीचे माजी सरपंच दिग्विजय जगताप यांच्या वतीने मुस्लिम बांधवांना साखरेचे वाटप करण्यात आले.