अवघ्या ७ वर्षीय हम्जा वसीम आत्तार ने केले ३० रोजे

Pune Reporter
अवघ्या ७ वर्षीय  हम्जा वसीम आत्तार ने केले ३० रोजे


पुरंदर तालुक्यात विक्रम स्थापन; अल्लहा प्रती केली श्रद्धा व्यक्त!

पुरंदर :  प्रतिनिधी

     मुस्लिम धर्मियांचा पवित्र महिना रमजान मागील तीन दिवसांपासून सुरू आहे. याकाळात मुस्लिम बांधव रोजे (उपवास) अदा करतात. दिवसभर अन्न त्याग व  निर्जल व्रत असते. तीस दिवस रोजे अदा करणे खुप पवित्र मानले जाते. याच प्रकारे जेजुरी येथील अवघ्य ७ वर्षीय चि. हम्जा वसीम आत्तार यामुलाने महिण्याचे ३० रोजे अदा करुन पुरंदर तालुक्यात विक्रम स्थापन केला आहे. त्यच्या या उपवासाचे कौतुक पुरंदर तालुक्यातील जनतेने केले आहे. तर पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनीही हम्जा आत्तारचे अभिनंदन केले आहे.
जाहिरात

       जेजुरी येथील हम्जा वसीम आत्तार वय ७ वर्षाच्या लहान मुलाने पवित्र अश्या रमजान महिन्यानिम्मित संपूर्ण महिना ३० दिवस  रमजान रोजे (उपवास) पूर्ण केले. या वर्षी हे उपवास उन्हाळ्यात आल्याने मोठ्या यक्तींना सुद्धा हे उपवास करताना उन्हाळ्यचा त्रास होत होता. परंतु या लहानग्याने एकही दिवस नचुकता हे उपवास पूर्ण केले आहेत. कोरोना संसर्ग होऊ नये म्हणुन यावर्षी थंड पैय टाळली गेली त्यामुळे घशात कोरड पडत असे. लॉकडाऊनच्या काळात काही खद्यपधार्थ उपलब्ध झाले नाहीत. मात्र पुरंदरच्या लोकप्रतिनिधी याची दखल घेत घरपोच पवित्र व उच्च दर्जाची खजूर दिली.

         मुस्लिम धर्मीयांचा पवित्र महिना रमजान सुरू आहे. या महिनाभरात मुस्लिम कुटुंबातील सदस्य पवित्र रोजे ठेवतात. दिवसभरात पाच वेळा नमाज अदा करण्यात येत. रात्री अल्ला प्रती श्रद्धा व्यक्त करत पवित्र कुराण पठण केले जाते. उपवासातील २७ वा दिवस फार महत्त्वाचा असतो. या दिवशी मुस्लिम कुटुंबातील सर्व सदस्य रोजे अदा करतात. या दिवशी उपास केल्याने पुन्य मिळते अशी भावना आहे. याच काळात अन्नदानाला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. हम्जा वसीम आत्तार या लहानग्याने केलेल्या उपासा निमित्त पुरंदरच्या आमदारांसह, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदिप पोमण, शिवसेना तालुकाप्रमुख दिलीप यादव, भाजपचे तालुकाध्यक्ष आर. एन. जगताप, जेजुरीच्या नगराध्यक्षा विणा सोनवणे, मार्तंड देवस्थानचे प्रमुख विश्वस्त संदिप जगताप आदिंनी कौतुक करत अभिनंदन केले.
जाहिरात
To Top