लोणी भापकर येथे ज्येष्ठ महिलेस कोरोना

Pune Reporter
लोणी भापकर येथे ज्येष्ठ महिलेस कोरोना 

बारामतीत  संक्रमितांची संख्या १५ वर

लोणीभापकर प्रतिनिधी

 मुंबई घाटकोपर येथून  लोणी भापकर ता. बारामती येथे आलेल्या ७० वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाली असल्याचे तपासणी अहवालात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे बारामतीतील कोरोना संक्रमितांची संख्या १५ झाली आहे.
कोरोना संक्रमित महिला घाटकोपर मुंबई येथुन लोणी
भापकर येथे दि(१८)रोजी आली असून श्वसनाचा त्रास
होत सदर महिलेची कोविड 19 चाचणी घेतली होती.
त्यामध्ये ती पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले.
जाहिरात

 लोणीभापकर महसूली गावाची सीमा ही प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व सेवा व वाहतुकीस बंदी घालण्यात येतआहे. 

  लोणी भापकर ता बारामती येथील
नागरिकांना आवाहान करण्यात येत आहे की आपण
आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी कुठल्याही परिस्थितीमध्ये घराच्या बाहेर पडू नये मास्कचा व सॅनिटायझरचा वापर करावा असे आव्हान तालुकाआरोग्य अधिकारी डॉ. मनोज  खोमणे यांनी केले आहे 
जाहिरात

To Top