पक्षांच्या चाऱ्यासाठी ना नफा ना तोटा तत्वावर भांडी, को-हाळे येथील युवकाचा उपक्रम

Pune Reporter

पक्षांच्या चाऱ्यासाठी  ना नफा ना तोटा तत्वावर भांडी, को-हाळे बु॥ येथील युवकाचा उपक्रम

को-हाळे बु॥  प्रतिनिधी

 बारामती तालुक्यातील को-हाळे बू।। येथील पक्षी मित्र सुनिल खोमणे यांनी ना नफा ना तोटा या तत्वावर सामाजिक बांधिलकी जपत पक्षांसाठी पाणी व अन्न मिळणेसाठी शेतात ठेवता येतील अशी भांडी उपलब्ध करुन दिली आहेत. या उपक्रमाचे तालुक्यातुन  कौतुक होत आहे. 
जाहिरात
         पशुपक्ष्यांवर प्रेम करणारे पक्षीप्रेमी अनेक आहेत. अशाच एका पशु पक्षावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीने अभिनव संकल्पना राबवून पशुपक्ष्यांना चारा व पाणी मिळेल, याची व्यवस्था एकाच ठिकाणी सुंदर कल्पनेतून केलेली असल्याने सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलेला आहे.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पशुपक्ष्यांना पिण्यासाठी पाणी मिळत नसते. त्यामुळे अनेक लोक आपल्या घराभोवती, झाडावर, घराच्या छतावर, मातीची मडकी अथवा भांड्यामध्ये पाणी ठेवत असतात. त्यामुळे पशुपक्ष्यांना उन्हाळ्यामध्ये पिण्याकरता पाणी मिळत असल्यामुळे त्यांची अडचण दूर होते.
जाहिरात
पशुपक्षी प्रेमी यांनी चांगली संकल्पना राबविलेली आहे. तेलाचा रिकामा डबा चारी बाजूंनी कट करून त्यामध्ये अन्नधान्य आणि डब्याचा मध्यभाग यामध्ये पाणी ठेवलेले असल्याने पशुपक्ष्यांना एकाच ठिकाणी चारा व पाणी मिळणार आहे. या संकल्पनेतुन सुनील खोमणे यांनी तेलाचे रिकामे।डब्बे आणून ते स्वतःच्या घरी बनवत आहेत, यामध्ये त्यांना त्यांचे कुटुंब सुद्धा हातभार लावत आहे. 
       
 बारामती परिसरात कोणाला हवी असेल तर खालील नंबरवर संपर्क करा
सुनील खोमणे- ९९२१८५१०९९
To Top