प्रमोदकाका काकडे फाउंडेशनच्या वतीने पोलीस पत्रकारांना गोळ्यांचे वाटप

Pune Reporter

प्रमोदकाका काकडे फाउंडेशनच्या वतीने पोलीस पत्रकारांना गोळ्यांचे वाटप

सोमेश्वरनगर  प्रतिनिधी

येथील प्रमोदकाका काकडे फाउंडेशन च्या वतीने करंजेपुल औटपोस्ट चे पोलीस आणि सोमेश्वरनगर चे पत्रकार बांधव यांना होमिओपॅथी आर्सेनिकम अल्बम 30 या गोळ्यांचे वाटप करण्यात आले. 
जाहिरात

          कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव सध्या  सर्वांच्या चिंतेचा विषय आहे. कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत देखील आता वाढ होत आहे. मृत्यूदर कमी असला तरी कोरोनाला रोखायचे कसे? शिवाय, ग्रामीण भागामध्ये  देखील आता कोरोनाचा शिरकाव होत आहे. दरम्यान, कोरोनावर औषधोपचार उपलब्ध नसल्याने आता रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे हाच एकमेव पर्याय आहे. 
आपल्या सर्वांच्या सुरक्षेसाठी झटणारे पोलिस बांधव व वेळेवेळी आपल्याला अचूक व योग्य माहिती बातम्यांच्या स्वरूपात  पुरवणारे सोमेश्वरनगर परिसरातील  पत्रकार बांधव या कोरोना योध्यांना  होमिओपॅथी आर्सेनिकम अल्बम 30 (Arsenicum album 30)  या गोळ्यांचे वाटप करण्यात आले प्रमोदकाका काकडे  फाऊंडेशन च्यावतीने या गोळ्यांचे वाटप करण्यात आले. 
जाहिरात
         डॉ सौरभ प्रमोद काकडे यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम राबविण्यात आला, यावेळी वडगाव निंबाळकर ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुभाष मुंढे, पोलीस हवालदार महेंद्र फणसे,  जेष्ठ पत्रकार दत्ता माळशिकारे, बारामती तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश जगताप, पत्रकार तुषार धुमाळ, विनोद गोलांडे, आरोग्य कर्मचारी परवेज मुलाणी, सागर काकडे, स्वप्नील काकडे आदी मान्यवर उपस्थित होते. 

परवेज मुलाणी यांची पोलीस, पत्रकारांबरोबर ईद साजरी

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात कार्यरत असलेले परवेज मुलाणी यांनी रमजान ईद चा सण पोलीस आणि पत्रकार बांधवांच्या समवेत साजरा केला, मुलाणी यांनी पोलीस आणि पत्रकारांना सोशल डिस्टन्स चे पालन करत  सिरखुरम्याची मेजवानी दिली, मुलाणी यांना पोलीस आणि पत्रकारांच्या  वतीने ईद च्या शुभेच्छा देण्यात आल्या.
____

To Top