मुरूम ग्रामपंचायत हद्दीतील मेडिकल आणि किराणा वगळता इतर दुकाने सर्व बंद

Pune Reporter
मुरूम ग्रामपंचायत हद्दीतील मेडिकल आणि किराणा वगळता इतर दुकाने सर्व बंद

सोमेश्वरनगर  प्रतिनिधी

मुरूम ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या मुख्य बाजारपेठेतील व इतर ठिकाणांवरील  अत्यावश्यक सेवा असलेली मेडिकल आणि किराणा माल दुकाने वगळून इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती उपसरपंच निलेश शिंदे यांनी दिली. 
जाहिरात
       यामध्ये अत्यावश्यक सेवेत असलेले मेडिकल हे पूर्ण वेळ चालू राहणार असून किराणा माल हे ८ ते ११ या वेळेत चालू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून पुढील निर्णय येईपर्यंत दुकाने बंद ठेवली जाणार आहेत. 
          तसेच बाहेरील गावावरून येणाऱ्या लोकांना क्वॉरेंटाईन करण्याबाबत आज तातडीने ग्रामपंचायत सदस्यांची बैठक बोलविण्यात आली आहे. मुर्टी येथे आज एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. ग्रामपंचायत परिसरात बिगर मास्क कोणी व्यक्ती सापडली तर त्याच्याकडून ५०० रुपये दंड आकारण्यात येईल अशी माहिती ग्रामपंचायत प्रशासनाने दिली आहे.
To Top