कलिगंड वाहतुकीचा बहाणा करत गोमांस वाहतुक
नीरा : सनी निगडे प्रतिनिधी
सातारा व पुणे जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या पाडेगाव ता खंडाळा गावच्या हद्दीमध्ये पाडेगाव टोल नाक्याजवळ अशोक लेलंड कंपनीचा पिकअप गाडीतुन रविवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास गाडीत कलिगंड असल्याचा बहाना करुन १ लाख ६० हजार रुपये किंमतीचे ८०० किलो बेकायदेशीर गोमांस वाहतुक करत असल्याप्रकरणी दोन जणाना लोणंद पोलीसांनी ताब्यात घेतले असुन त्यांच्या कडुन गोमांस व पिकअप गाडी असा सुमारे ४ लाख १० हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल लोणंद पोलीसांनी ताब्यात घेतला आहे,
याबाबत लोणंद पोलीस स्टेशन मधुन मिळालेली आधिक माहिती अशी की रविवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पाडेगाव (ता.खंडाळा) गावचे हद्दीत पाडेगाव टोलनाका फिक्स पॉईटवर लोणंद पोलीस नाकाबंदी करीत असताना फलटण बाजुकडुन निरा बाजुकडे एक अशोक लेलड कंपनीची पिकअपक्रमांक एम एच १४ एफ, टी ६६८ मधुन दिशाभूल करण्यासाठी पाठीमगील बाजुस कलिंगड भरून पुढील बाजुस बेकायदा बिगरपरवाना १ लाख ६० हजार रुपये किंमतीचे ८०० किलो भरून अजिम पिरअहमद शेख वय २५ वर्षे रा. बाभळगाव ता.औरद जि. बिदर, राज्य कर्नाटक व जय धरम फुलेल वय १८ वर्षे रा.जुनी भाजीमंडई बीड जि.बिड यांनी तोंडास मास्क न लावता वाहनाने गोमांसाची वाहतुक करताना व्यक्तीगत सुरक्षा धोक्यात येईल हे माहीत असताना सुध्दा कोरोना संसर्ग पसरविण्याचे घातक कृत्य करुन गोमांसाची वाहतुक केल्या प्रकरणी तसेच जिल्हाधिकारी यांनी कलम १४४ प्रमाणे पारित केलेल्या आदेशाचे उल्लघन केले म्हणुन लोणंद पोलीसानी दोन जणांना ताब्यात घेतले असुन त्याच्या कडुन गोमांस व पिकअप गाडी असा सुमारे ४ लाख १० हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे, या घटनेची फिर्याद पोलीस कॉस्टेबल अमोल आडसुळ यांनी दिली असुन या घटनेचा तपास महामुलकर हे करत आहेत,