सोमेश्वरनगर परिसरातून छत्तीसगडला ६६ लोक रवाना

Pune Reporter
सोमेश्वरनगर परिसरातून छत्तीसगडला ६६ लोक रवाना

सोमेश्वरनगर   प्रतिनिधी

सोमेश्वरनगर परिसरातील वाणेवाडी, मुरूम आणि वाघळवाडी परिसरातील ६६ लोक छत्तीसगड ला रवाना करण्यात आली आहेत. 
जाहिरात
             बारामती महसूल विभाग आणि वडगाव निंबाळकर पोलिसांनी पुढाकार घेत तीन बसेस मधून या लोकांना छत्तीसगड ला सुखरूप रवाना केले. सोमेश्वरनगर परिसरात मुरूम, वाणेवाडी आणि वाघळवाडी या ठिकाणी वीटभट्टी, बांधकाम आणि खडी क्रशर वर हे लोक गेल्या अनेक महिन्यापासून काम करत होते. बारामती महसूल विभागाने पुढाकार घेत या लोकांना सुखरूप आपल्या गावी पाठविले. यामध्ये लहान मुले, महिला आणि पुरुष यांचा सामावेश आहे. यावेळी वाणेवाडी चे गावकामगार तलाठी ए डी होळकर, वडगाव निंबाळकर चे पोलीस हवालदार महेंद्र फणसे, गोपीनिय विभागाचे ज्ञानेश्वर सानप यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. पुढील टप्प्यात झारखंड, उत्तर प्रदेश आणि बिहार ची लोक पाठविले जाणार असल्याची माहिती महसूल विभागाने दिली.

To Top