माळेगाव कारखाना अपघातातील एकाचा मृत्यू

Pune Reporter
माळेगाव कारखाना अपघातातील एकाचा मृत्यू

माळेगाव  प्रतिनिधी

 बारामती तालुक्यातील माळेगाव साखर कारखान्यात शनिवार दि.२३ रोजी बारा कामगारांना अपघात झाला होता. यामधील कामगार शिवाजी भोसले याचा मध्यरात्री २:३० च्या दरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती कारखाना प्रशासनाने दिली.
जाहिरात
       दरम्यान पुणे येथे उपचार घेत असलेले कामगार घनश्याम निंबाळकर याची प्रकृती देखील चिंताजनक असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काल तातडीने दुर्घटनाग्रस्त कामगारांची विचारपूस केली होती. 
         काल बारामती तालुक्यातील माळेगाव साखर कारखान्यातील टाकीची सफाई करताना  मिथेल वायुची गळती होऊन १२ कामगार बेशद्ध पडल्याची घटना घडली आहे.
जाहिरात
  काल सकाळी साडेनऊ वाजता ही घटना घडली, सर्वांची प्रकृती स्थिर होती मात्र रात्री या घटनेतील एका कामगाराचा मृत्यू झाला आहे.
To Top