४७ लक्ष २३ हजार ३०० रुपये किंमतीचे साधनसामग्री जप्त
नीरा : प्रतिनिधी, सनी निगडे
महसूल विभाग कोरोना कोव्हिड १९ विषाणू रोगाशी दोन हात करण्यात गुंतलेल्याने अट्टल वाळु चोर आपली पोळी भाजून घेत होते. पुणे व सातारा जिल्ह्याच्या सिमेवरुन वाहणाऱ्या नीरा नदीतून अनाधिकृत पुणे वाळूउपसा करणा-यांवर जेजुरी पोलीस व पुरंदर महसूल प्रशासनाने धडक कारवाई केली. धनदांडगे असलेले हे वाळुचोर पावसाळ्यापूर्वी मोठ्या प्रमाणावर वाळु उपसत असल्याने नीरा नदिपात्राला धोका निर्माण झाल्याचे ग्रामस्थ सांगतात.
पुणे जिल्ह्याचे व पुरंदर तालुक्यातील शेवटचे टोक असलेल्या जेऊर गावच्या दक्षिणेकडे नीरा नदी वाहते नदीचा अर्धा भाग पुणे जिल्ह्यात तर अर्धा भाग सातारा जिल्ह्यात येतो. जेजुरी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार काल रात्री खब-या मार्फत फोनवरून जेऊर गावच्य हद्दितील नीरा नदीच्या पात्रात अवैध वाळू उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळताच जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने, देवेंद्र खांडे, एस.एन.स्वामी यांनी घटनास्थळी धाव घेतली असता ३५ सर्रास वाळू, दोन पोकलेन मशिन, दोन ट्रॅक्टर, जाळीसह ट्रॅली, एक डंपर, वाळू धुण्यासाठी इंजिन असे साहित्य नदिपात्रात दिसून आले. पुरंदरच्या महसूल विभागाला याबाबत कळवले असता जेऊर गावचे गावकामगार तलाठी नंदकुमार खरात यांनी पंचनामा केला. सर्वसाहित्यांची किंमती ४७ लक्ष २३ हजार ३०० रुपये झाल्याचे सांगण्यात आले.
वाळू वाहतुकीसाठी हायवा डंपर, दोन ट्रॅक्टर जाळीसह ट्रॅली, वाळु उत्खननासाठी वापरात असलेले एक पोकलेन मशीन व एक वाळु धुण्यासाऊ इंजीन हे साहित्य जप्त करण्यात आले आहे एक पोकलेन मशीन चैन नादुरुस्त झाल्याने घटनास्थळी असुन या साहित्याचे मालक राजेंद्र बजरंग पटणे रा.पिंपरे (खुर्द), संजय मारुती धुमाळ, दत्तात्रय श्रीरंग धुमाळ दोघे रा.जेऊर ता.पुरंदर, हणुमंत पोपटराव होळकर या रुई,ता.खंडाळा, जी.सातारा यांसह सहा ते आठ साथिदारांवर वाळु उपस्थितांसाठी साधने, वाहतुकीसाठी वाहणे, वाळु चोरी तसेच उपसा व साठा करून शासनाच महसूल बुडवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे जेजुरी पोलीसांनी सांगितले सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पुढिल तपास सुरू आहे.
#जाहिरात