पुरंदर तालुक्यात पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण .

Pune Reporter
पुरंदर तालुक्यात पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण .

नीरा : प्रतिनिधी (सनी निगडे )

    लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर गेली पंचेचाळीस दिवस पुरंदर तालुक्यात एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही. पुरंदर तालुक्याच्या सिमेवरील पुणे, हवेली, बारामती, दौंड, सातारा जिल्ह्यातील खंडाळा, फलटण या जवळच्या गावात रुग्ण पॉझिटिव्ह आढळले पण पुरंदर निल्ल असलेल्याने पुरंदरकर निश्चिंत होते. पण आज सकाळी पुरंदरच्या मध्यवर्ती जेजुरी नगरपालिकेच्या हद्दीत कोरोना कोव्हिड चाचणी पॉझिटिव्ह आल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे.
       मिळालेल्या माहितीनुसार जेजुरी पोलीसांनी हद्दितील पोलीस पाटलांना सकाळी सहाच्या सुमारास माहिती दिली पण आरोग्य व तहसील प्रशासनाने गप्प होते. पण १ रुग्ण पॉझिटिव्ह असल्याची माहिती वा-यासारखी तालुक्यातील पसरली आहे. लोकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. लोकांनी घाबरुन जाऊ नये. फक्त घरचीच रहा असे सांगितले जात आहे. घाबरण्याचे काही कारण नाही.
      पॉझिटिव्ह असलेली व्यक्ती जादा लोकांच्या संपर्कात आली नसेल्याचे समजते. तो व्यक्ती उच्च शिक्षित व याच क्षेत्रातील आहेत. त्यांनी संपूर्ण काळ्जी घेतली होती. त्यांना कोणतीही लक्षणे नव्हती. प्रशासन उपाययोजना करण्यात व्यस्त आहे. प्रशासनाला‌ सहकार्य करावे. शांतता भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी.
To Top