'लॉकडाऊनच्या काळात चिऊताई इतका वाटा उचलुन गोरगरीबांना मदत' सुनील धिवार.
नीरा :
'कोरोनामुळे जगात महामरीचा वणवण पेटला आहे. जगातील संपूर्ण मानव जतच नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. अशा वेळी माणूसच माणसाच्य उपयोगी पडणार आहे. म्हणुच आम्ही चिऊताई इतका वाटा उचलुन गोरगरीबांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत असे प्रतिपादन सुनील धिवार यांनी केले.
लॉकडाऊनच्या काळात मोलमजुरी करून उपजिवीका करणाऱ्यांना मदत मिळावी म्हणुन बुद्ध जयंती निमित्त बहुजन हक्क परिषदेच्या वतीने संसार उपयोगी अत्याश्यक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी परिषदेचे अध्यक्ष सुनील धिवार बोलत होते. नीरेतील राधाकृष्ण मंगल कार्यालयात सोशल डिस्टंसींग पाळत हे वाटप करण्यात आले. जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने, अॅड.विजय भालेराव,अॅड. उत्तम अगवणे, माजी सरपंच राजेश काकडे, सुनील जाधव, इम्राण पाणसरे, परवीणताई पाणसरे, कैलास धिवार, अभिषेक भालेराव, नंदू शिंदे, हरिभाऊ जेधे, सतिश पवार, शुभम जावळे यांसह बहुजन हक्क परिषदेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
लॉकडाऊनच्या काळात लोकांना काम नसल्याने घर खर्चाला पैसे नाहीत. आशा वेळी बहुजन हक्क परिषदेच्या वतीने विविध प्रकारच्या चार डाळी, वेगवेगळे मसले, चहापत्ती, स्वच्छतेसाठी कपड्याचे साबण आणि हात धुण्यासाठी डेटॉल साबण मोफत देण्यात आले. मोलमजुरी विना उपजिवीका कशी करायची या विवंचनेत असलेल्या लोकांना हे साहित्य मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.