आ.संजय जगतापांचे नीरेतील वृध्दांनी केले तोंड भरून कौतुक.
पुरंदर : प्रतिनिधी
खरे तर गेले कित्तेक दिवस कोरोनाच्या भीषण संकटा मध्ये पुरंदरचे आमदार संजयजी जगताप आणि ग्रामीण संस्थेच्या अध्यक्ष राजवर्धिनी संजय जगताप हे दोघे तालुक्यातील प्रत्येक कुटुंबाला काही त्रास होऊ नये म्हणून लॉकडाऊन चालू झाल्यापासून पळत आहेत. आनंदी थाळीच्या माध्यमातून गरमगरम जेवण असेल किंवा ग्रामीण संस्थेच्या माध्यमातून डॉक्टर्स, पोलिस, नर्स, अंगणवाडी सेविका, प्रशासकीय अधिकारी ह्या सर्वांना मास्क सॅनिटायजर पी.पी.ई. किट असो अश्या सगळ्या गोष्टींचा मोफत पुरवठा आज पर्यंत चालू आहे. पुढील काळातही गरज पडेल ते सहकर्य जगताप परिवार करतील अशी आशा पुरंदर तालुका काँग्रेस सरचिटणीस संदेश गायकवाड यांनी व्यक्त केली.
गायकवाड पुढे म्हणाले आज तालुक्यातील सर्वसामान्य जनेतची प्रतिकार शक्ती वाढावी म्हणून आर्सेनिक अलबुमीन ३० ह्या गोळ्यांचे आणि त्या कश्या घायच्या त्याच्या महितीपत्रकासोबत प्रत्येक घरी जाऊन दिल्या. निरेतील प्रभाग तीन मध्ये बाप्पू गायकवाड, सागर कांबळे, विजय सपकाळ, इरफानभाई सय्यद यांनी गोळ्या वाटप केले. या गोळ्या वाटत असताना वृध्द व्यक्तींनी थांबवून आमदार संजयजी जगताप आणि वाहिनीसाहेब यांच्या कार्याचे खरेच खूप तोंड भरून कौतुक केले. पाठीवर थाप मारून देवालाच जणू काळजी होती की असे संकट येईल आणि ह्या मध्ये फक्त संजय जगतापच काळजी घेतील म्हणून की काय त्यांना आपल्या तालुक्याचे आमदार म्हणून निवडून दिले. आमचे आशीर्वाद त्यांच्या सदैव पाठीशी राहतील. वाहिणीसाहेब पण एवढी काळजी घेत आहेत त्यांचे पण तोंड भरून कौतुक केले.
खरे तर आज बऱ्याच ठिकाणी मन भरून आले डोळ्यातून आपसूक पाण्याच्या धारा आल्या. खरेच असे पुण्याचे काम करायची संधी आज या दोन्ही उभयतांमुळे मिळाली हयचा कायम अभिमान राहील.
तमाम निरेकर आपले कायम ऋणी राहतील. पुन्हा एकदा आमदार संजयजी जगताप आणि ग्रामीण संस्था आणि त्याच्या अध्यक्ष आदरणीय राजवर्धिनी जगताप आणि संजय जगताप मित्र परिवार ह्यांचे सर्वांचे पुनःश्च खूप खूप आभार.
COMMENTS