पळशीत आर्सेनिक आल्बम ३० गोळ्यांचे वाटप
लोणीभापकर : प्रतिनिधी
पळशी (ता.बारामती) याठिकाणी दि.१० जून रोजी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या २९५ व्या जयंतीनिमित्त व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त ताई मेडिकल फाऊंडेशन व साईशंभो कंस्ट्रक्शन तर्फे १५० कुटुंबाना आर्सेनिक आल्बम ३० ह्या कोरोना विषाणू प्रतिबंधक गोळ्याचे फाऊंडेशनचे अध्यक्ष देवीदास जगताप, सचिव डॉ.चेतन जगताप, जगताप हॉस्पिटल वडगाव निबांळकर यांच्याकडून पंचायत समिती सदस्य राहुल भापकर यांच्या हस्ते मोफत वाटप करण्यात आले. सोशल डिस्टिंनिंग व नियम यांचे पालन करुन गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी सरपंच बाबासाहेब चोरमले, उपसरपंच संदिप कोळेकर, ग्रामपंचायत सदस्य मामा माने, ललिता हाके, लखन कोळेकर, बाबासाहेब सोनवलकर, गुलदगडसर, वसंत कोळेकर, आरोग्यसेविका छाया शिंदे, आशा सेविका व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन साई शंभो कंस्ट्रक्शन चे शिवराज माने यांनी केले होते. कार्यक्रमावेळी सरपंच चोरमले व डॉ.चेतन जगताप यांनी मार्गदर्शन केले तर सुत्रसंचालन व आभार शिवराज माने यानी मानले.
COMMENTS