पुरंदरच्या तहसील कचेरीतील एकाला कोरोनाचा संसर्ग
पुरंदर : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील महसुल कार्यालयातील एक कर्मचा-याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. गेली तीन दिवस तो सासवडच्यातहसील कचेरीत कामावर आला नव्हता. सोमवारी लक्षण दिसून आल्याने मंगळवारी स्वॅप तापसनिकरिता पाठविला होता. त्याचा अहवाल काल रात्री पॉझिटिव्ह आल्याचे तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी सांगितले.
सासवड येथील तहसील कार्यालयाचा एक कर्मचाऱ्याचा अहवाल कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला आहे. पुणे येथे दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. सदर कर्मचारी शनिवार पासून कार्यालयात आलेला नाही.
त्यांना सोमवारी लक्षण दिसून आल्याने मंगळवारी त्याचा स्वॅप तापसनिकरिता पाठविला होता. त्याचा अहवाल काल मंगळवारी रात्री प्राप्त झाला. पुढील प्रक्रिया करण्यात येत आहे. पुरंदर तालुक्यात आतापर्यंत एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण १३ इतकी संख्या झालेली असून त्यापैकी दोन मयत आहेत. आज दवाखान्यात एकूण ५ रुग्ण आहेत, ६ जण उपचार घेऊन परत आले आहेत.
हा रुग्ण पुरंदरच्या तहसील कचेरी कामाला आहे. हा व्यक्ती पुरंदरच्या तहसीलदारांच्या सोबतीला सतत असतो, तहसीलदारांच्या दौऱ्यामध्ये सतत सहभागी असतो. हा युवक तब्येतीने उत्तम असल्याने फक्त कोरोनाचा संसर्ग झाल्याने लक्षणे दिसत असली तरी हा व्यक्ती कोरोनावर मात करून, लवकरच तहसीलदारांच्या सेवेत आणि पुरंदरच्या कोरोना युद्धाच्या लढ्यात सहभागी होईल अशी आशा सोमेश्वर रिपोर्टर व्यक्त करीत आहे.
COMMENTS