वाघळवाडीच्या महिला सरपंचाचे मंगळसूत्र हिसकावले

Admin
वाघळवाडीच्या महिला सरपंचाचे मंगळसूत्र हिसकावले

सोमेश्वरनगर    प्रतिनिधी

वाघळवाडी तालुका बारामती येथे निरा -बारामती  रस्त्या वर व्यायामासाठी निघालेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून नेण्याचा प्रयत्न झाला .गुरुवार दि ११ रोजी पहाटे ५.३० दरम्यान हि घटना घडली.
याबाबत माहिती अशी की ,आज सकाळी ५.३० वा सरपंच नंदा सकुंडे व ४ ते ५ महिला व्यायाम साठी निरा-बारामती रोड ने चालत होत्या त्यावेळी मोटरसाइकिल वर दोन अज्ञात व्यक्तिंनि सरपंच नंदा सकुंडे यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकविण्याचा प्रयत्न केला. ते तुटले व खाली पडले शेजारील महिलांनी आरडाओरड केल्यामुळे चोरांनी पळ काढला  सर्व महिला खूप घाबरल्या त्यामुळे महिलांच्यात भितीचे प्रमाण वाढले 
मागील दोन दिवस पुर्वी गावातिल उप सरपंच जितेंद्र सकुंडे यांच्या ऑफिस मधिल एल ई डी टीव्हि संच व सेट ऑफ बॉक्स सहित इतर साहित्य चोरीला गेले आहे तसेच वारंवार पेट्रोल, डिझेल, ४ चाकी, ट्रॅक्टर यांच्या बॅटरी तसेच इतर या चोरींचे हि प्रमाण वाढले आहे तरी सर्व चोरांचा बंदोबस्त लवकरात लवकर करावा अशी मागणी ग्रामस्थ, महिलांनी केली आहे.

*चोरांचा सुळसुळाट*
कोरोणामुळे संपूर्ण देशामध्ये जवळपास तीन महिने संपूर्ण देशामध्ये लॉकडाउन पाळण्यात पडली .जसा इतर व्यवसायावरती परिणाम झाला तसा अवैध धंद्यांवर तीही लॉग डाऊनचा परिणाम झाला त्यामुळे अवैध सावकारी ,दलाली ,मोठ्या जबरी चोऱ्या हेही धंदे बंद पडले यामुळे व्यसनाधिनतेचा व आशो आराम  जीवनाच्या आहारी गेलेल्या तरुणांना आता पैसा मिळणे कठीण झाले आहे . त्यामूळे बाहेर नागरिकांना ते थेट लक्ष्य करू लागले आहेत .
To Top