निरेतील मुलींना रशियातून मायदेशी परत आणण्यासाठी शरद पवार यांना साकडे

Pune Reporter

निरेतील मुलींना रशियातून मायदेशी परत आणण्यासाठी शरद पवार यांना साकडे

सोमेश्वरनगर  :  प्रतिनिधी

निरा ता पुरंदर येथील दोन मुली रशिया देशातील कझान या शहरात एमबीबीएस चे शिक्षण घेत असून त्यांना त्यांच्या मायदेशी भारतात परत आणण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा अशी विनंती सोमेश्वर कारखान्याचे संचालक लक्ष्मण गोफणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांना पत्राद्वारे केली आहे. 
        लक्ष्मण गोफणे यांनी श्री पवार यांना लिहलेल्या पत्रात म्हनटले आहे की, पुरंदर तालुक्यातील निरा येथील  अलिशा नवेंदू शहा व गुरुत्वा हनुमंत सपकाळ या दोन मुली सध्या त्या रशिया देशामध्ये MBBS चे शिक्षण घेत आहेत. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे त्या रशियामधील कझान या शहरामध्ये अडकलेल्या आहेत. सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता त्यांचे नातेवाईक अत्यंत व्यथित झालेले आहेत. दि.५जुलै २०२० रोजी नागपूर या ठिकाणी रशिया या देशामधील मॉस्को शहरामधून वंदे भारत मिशन मधून प्लेन येणार आहे. सदर प्लेनमध्ये त्यांना बुकींग मिळणेकामी आपले सहकार्य व्हावे तसेच आपल्या कार्यक्षेत्रातील दोन्ही मुलींना मायदेशी परत आणणेबाबत आपणाकडून संबंधीतांना जरुर त्या सुचना होणेविषयी नम्र विनंती
To Top