पुरंदरसह सासवड कोरोनाचा हॉटस्पॉट होत आहे : एकाच दिवशी १३ रुग्ण पॉझिटिव्ह
पुरंदर : प्रतिनिधी
पुरंदर तालुका हॉटस्पॉट होऊ लागला आहे. कोरोनाच्या रुग्णांमध्ये मागील आठवड्यात एक एकने वाढ होत होती, मात्र आज ३० जून रोजी दुपारी अचानक १३ रुग्णांची वाढ झाल्याने, दुपारी तीन वाजेपर्यंत एकाच दिवशी १३ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने सासवड शहरात व पुरंदर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
पुरंदर तालुक्यातील सासवड शहर कोरोनाचा हॉटस्पॉट बनत चालला आहे. पुरंदर तालुक्यात आज ३० रोजी आतापर्यंत (सकाळचा अहवाल धरून) १४ व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत. १३ व्यक्ती सासवड येथील आहे. एक व्यक्ती ग्रामीण भागातील सोनोरी येथील हायरीस्क संपर्कातील आहे. सासवड येथील १३ व्यक्तींपैकी तीन व्यक्ती नवीन आहेत. (लांडगे अळी, पातीनाथ सोसायटी, MSEB ऑफिस समोरील) १० व्यक्ती पूर्वीच्या रुग्णाच्या संपर्कातील आहे.
कालच लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या वतीने सासवडचा जनता कर्फ्यू शिथिल करण्यात आला आहे. आज पुन्हा एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह वाढल्याने आता चिंता वाढत आहे.
COMMENTS