पुरंदरच्या सासवडच्या लांडगे आळीत एक कोरोना पॉझिटिव्ह.
पुरंदर : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील सासवड शहर कोरोनाचा हॉटस्पॉट बनत चालला आहे. आज ३० रोजी पुरंदर तालुक्यातील सासवड लांडगे अळी येथील एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.
पुरंदर तालुक्यात आज आतापर्यंत (सकाळचा अहवाल धरून) १४ व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत. १३ व्यक्ती सासवड येथील आहे. एक व्यक्ती ग्रामीण भागातील सोनोरी येथील हायरीस्क संपर्कातील आहे. सासवड येथील १३ व्यक्तींपैकी तीन व्यक्ती नवीन आहेत. (लांडगे अळी, पातीनाथ सोसायटी, MSEB ऑफिस समोरील)
१० व्यक्ती पूर्वीच्या रुग्णाच्या संपर्कातील आहे.
कालच लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या वतीने सासवडचा जनता कर्फ्यू शिथिल करण्यात आला आहे. आज पुन्हा एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह वाढल्याने आता चिंता वाढत आहे.
COMMENTS