सोमेश्वर कारखान्याकडून प्रतिटन १०० रुपये सभासदांच्या खात्यावर वर्ग
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
सोमेश्वर कारखान्याने २८०० रुपये प्रति मे.टनप्रमाणे पुर्ण पेमेंट सभासदांच्या खात्यावर वर्ग केले असुन आज दि ३० रोजी प्रति मे.टन १००/- रुपये प्रमाणे बेसल डोससाठी सभासदांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत. अशी माहिती अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने गाळप हंगाम २०१८-१९ मध्ये एकुण ९ लाख ३४ हजार ७८४ मे.टन ऊसाचे गाळप करुन संपुर्ण पुणे जिल्ह्यात ऊस गाळप, साखर उत्पादन व सरासरी साखर उतारा या बाबतीत क्रमांक एकवर राहुन ११.८६ टक्के साखर उतारा राखीत ११ लाख ८ हजार ९५० साखर पोत्यांचे उत्पादन घेतले होते. त्याचप्रमाणे कारखान्याच्या को जन प्रकल्पातुन ९ कोटी ३५ लाख ३७ हजार १८२ युनिट्स वीजेची निर्मीती करुन ६ कोटी ३४ लाख १ हजार युनिट्स वीजेची कारखान्याने विक्री केली.
तसेच कारखान्याच्या डिस्टीलरी प्रकल्पामधुन ८२ लाख ८६ हजार २०६ लिटर्स अल्कोहोलचे उत्पादन घेत आपण सर्वच बाबतीत जिल्ह्यात आघाडीवर राहिलो. आपण गाळप केलेल्या संपुर्णउसाचे एफआरपीप्रमाणे होणारे एकुण २८००/- रुपये प्रति मे.टनप्रमाणे पुर्ण पेमेंट सभासदांच्या खात्यावर वर्ग केले असून आज प्रति मे.टन १००/- रुपये प्रमाणे बेसल डोससाठी बँकेत पैसे वर्ग केले आहेत.
COMMENTS