पुरंदरच्या केतकावळे येथे एक कोरोना पॉझिटिव्ह : दिवसभरात पुरंदरचा आकडा १४ वर
पुरंदर: प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील शेवटचे टोक असलेल्या केतकावळे येथील एका व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव आला आहे. त्यामुळे पुरंदर तालुक्यातील रुग्णांची संख्या आजच्या दिवसभरात १५ वर पोहोचली आहे.
केतकावळे येथील एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे, अशी माहिती तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी दिली आहे. कालच सासवडचा जनता कर्फ्यू रद्द करून अंशता लॉकडाऊन व प्रभावित क्षेत्रात संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आला आहे. तरी सासवड मधील रुग्णांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे सासवडकर चिंतेत होते तर आता घाटाच्या खालीही कोरोना रुग्ण आढळल्याने पुरंदर तालुक्यात कोरोनाचा हॉटस्पॉट हॉटस्पॉट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पुढील काळात प्रशासन सतर्कता घेत वेगळे निर्णय घेणार आहे. मात्र लोकांनी या निर्णयाचे स्वागत करून शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास कोरोनाचा हॉटस्पॉट टळू शकतो व पुढील काळात तालुका कोरोना मुक्त होऊ शकतो, यासाठी प्रशासनाच्या सूचनांकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.