बारामतीत २२ वर्षीय तरुणाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
बारामती शहरातील भिगवण रस्त्या नजीक
अर्बनग्राम येथील एका २२ वर्षीय युवकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी दिली.
सदर तरुण हा मागील काही दिवसांपासून वर्क फ्रॉम होम करीत होता, मात्र पुणे येथे होमिओपॅथी औषध उपचारासाठी त्याचे जाणे झाल्याने त्या दरम्यानच्या प्रवासातच करोनाची बाधा झाल्याचा संशय आहे.
सदर तरुण हा २१ जून रोजी पुणे येथील निगडी येथे गेला होता. कामानिमित्त तो दिवसभर.तेथेच होता. तेथून पुन्हा बारामतीला आल्यानंतर त्यास सर्दीचा त्रास जाणवू लागल्याने त्याने स्वत:हून बारामती येथील रुई ग्रामीण रुग्णालय जाऊन तपासणी करण्याचा निर्णय घेतला. तपासणीत तो पॉझिटिव्ह असल्याचे.निष्पन्न झाले.
COMMENTS