वडगाव निंबाळकर येथील ओढ्यावर बंधाऱ्याचे काम सुरू

Pune Reporter
वडगाव निंबाळकर येथील ओढ्यावर बंधाऱ्याचे काम सुरू


संतोष भोसले, प्रतिनिधी
वडगाव निंबाळकर दि. २८ ः  


वडगाव निंबाळकर ता. बारामती येथिल नीरा डावा कालव्यावरील आठ मोरीच्या वरच्या बाजुला ओढ्यावर बंधाऱ्याचे काम सुरू करण्यात आले आहे. माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार यांच्या फंडातून 28 लाख रुपयांचा निधी यासाठी देण्यात आला आहे. मृद व जलसंधारण उपविभाग बारामती यांच्या मार्गदर्शनाखाली कामाला नुकतीच सुरुवात करण्यात आली आहे. 40 मीटर रुंद 2 मीटर खोल आणि 30 मीटर रुंद 300 मीटर लांबीचा बंधारा तयार होणार असल्याची माहिती शाखा अभियंता भूषण गाढवे यांनी दिली. वाकी तलावापासून चोपडज वडगाव येथून वाहनाऱ्या या ओढ्या वरती सुमारे सहा बंधारे तयार करण्यात आले आहेत. यापूर्वी तयार झालेल्या बंधाऱ्यामुळे लगतच्या शेतकऱ्यांना फायदा होत असल्याने ओढ्यावर बंधारे बांधले जात आहेत. कालव्यालगत आठमोरी परिसरात चोपडज, पळशी आणि वडगाव निंबाळकर या तीनही गावांतील नळ पाणीपुरवठा योजनेच्या विहिरी आहेत, या विहिरींना बंधाऱ्यामुळे फायदा होईल. 

To Top