पुरंदरच्या सासवडचे ४ व खळद येथील १ असे ५ कोरोना रुग्ण आढळले
पुरंदर : प्रतिनिधी
पुरंदरला कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. संसरर्गाचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. पुरंदर तालुक्यातील सासवड व खळद येथील एकुण पाच व्यक्तींचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची धक्कादायक माहिती पुरंदरच्या तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी दिली आहे.
सासवड येथील यापूर्वी सापडलेल्या रुग्णाच्या संपर्कातील दोन व्यक्ती, दत्तनगर सासवड येथील एक व्यक्ती, सासवड ST स्टँड मागील एक व्यक्ती व खळद येथील एक व्यक्ती असे एकूण पाच व्यक्तींचे अहवाल positive आले आहेत. आज रविवार दि.२८ रोजी दुपार पर्यंत एकूण सहा व्यक्तींचे अहवाल positive आले आहेत.
COMMENTS