खंडेराया चरणी शेतकऱ्याची १०१ किलो सफरचंदाची आरास
पुरंदर : प्रतिनिधी
महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाच्या चरणी पुण्याच्या एका शेतकऱ्याने सफरचंदाची आरास केली आहे. कोरोना संसर्ग वाढत असल्याने मंदिरे टाळाबंद आहेत. लॉकडाऊनच्या काळात भाविकांसाठी मंदिर बंद असले तरी भाविक मोठ्या श्रद्धेने आपले शेती उत्पन्न देवाचरणी ठेवत आहेत. शेतकरी मोठ्या भक्तिभावाने खंडेरायाच्या चरणी आपले पहिले उत्पन्न अर्पण करतात. आपले पहिले उत्पन्न देवा चरणी ठेवून पुढील उत्पन्नात मोठी भरभराट व्हावी यासाठी प्रार्थना करतात.
आज रविवारी १६ जून रोजी सकाळी खंडेरायाच्या गाभाऱ्याला १०१ किलो सफरचंदची आरास करण्यात आली आहे. पुण्याच्या भाविकाची खंडेरायाच्या चरणी १०१ किलो सफरचंदची आरास केली आली आहे. सर्व गाभाऱ्यला सफरचंदची सजावट करण्यात आली आहे. जरी भक्ताला सध्या कोरोनामुळे देवाकडे येता येत नसले तरी भक्त आपल्या शेतातील फळे देवाच्या चरणी अर्पण करताना दिसत आहेत.
काही दिवसांपूर्वी द्राक्षे तर आज पुण्यातील शेतकऱ्यांने सफरचंद देवाच्या चरणी अर्पण केले आहेत. देवाचा गाभारा सफचंदाच्या रंगांनी लाल झाला होता तर सुगंधाने नाहुन निघाला होता. यावेळी कोणालाही दर्शन देण्यात आले नाही. मात्र प्रसिद्ध छायाचित्रकार व खंडोबाभक्त गिरीश झगडे यांनी या सफरचंदाच्या आरासीचे उत्कृष्ट छायाचित्रे व व्हिडिओ काढून महाराष्ट्रातील खंडोबा भक्तांनसाठी वेगवेगळ्या माध्यामांना उपलब्ध करून दिले.