कुणी पाणी देता का..पाणी....- सोमेश्वरनगर येथील प्रकार
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर , वाघळवाडी येथिल ६० ते ७० वर्षांपासून राहत असलेल्या नागरिकांना अनेक दिवस मागणी करूनही पिण्यासाठी पाण्याचे नळ कनेक्शन , पथदिवे व अनेक मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे, जगण्यासाठी लागणारे पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने येथिल नागरिकांना अनेक मैलांचे अंतर चालत पार करून पिण्यासाठी पाणी आणावे लागत आहे. यामुळे लहुजी शक्ती सेनेच्या वतीने बारामतीच्या पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राहुल काळभोर यांना कन्नड वस्ती व लोखंडी पूल परिसरातील नागरिकांच्या समस्यांचे लेखी निवेदन देण्यात आले,
तसेच या मागण्या लवकरात लवकर मान्य होऊन त्या ठिकाणी उपाययोजना न केल्यास लहुजी शक्ती सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल अशी माहिती लहुजी शक्ती सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष कैलास सकट यांनी दिली.
यावेळी संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष कैलास सकट,
पुणे जिल्हा युवक अध्यक्ष पप्पू भिसे, बारामती तालुका कोअर कमिटी अध्यक्ष संजय नेटके, तालुका संपर्क प्रमुख मनोज कवाळे, प्रसिद्धी प्रमुख सचिन माने, तालुका कार्याध्यक्ष सचिन जाधव, धनाजी यादव, यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.
COMMENTS